लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे जेजुरीतील माजी नगरसेवक महेबूब पानसरे यांच्या खूनप्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पानसरे यांचा खून जमिनीच्या वादातून झाल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
husband of former BJP corporator, kidnapping,
पिंपरी : अपहरण, मारहाण प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविकेचा पती, माजी स्वीकृत सदस्यासह ११ जणांवर गुन्हा
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला

दत्ता मारुती मळेकर (वय ४५, रा. गुरुवार पेठ), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी वणेश प्रल्हाद परदेशी (सध्या रा. गुरुवार पेठ) आणि महादेव विठ्ठल गुरव उर्फ काका परदेशी (वय ६५, सध्या रा. ढालेवाडी, बेंदवस्ती, ता. पुरंदर) यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जेजुरी परिसरातील धालेवाडीत शुक्रवारी (७ जुलै) पानसरे यांच्यावर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी परदेशी यांच्यासह साथीदारांविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आणखी वाचा-पुण्यातील १७ नागरिक हिमाचल प्रदेशात पुरात अडकले, सात पर्यटक संपर्काबाहेर

आरोपी दत्ता मळेकर वाघोली परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. जमिनीच्या वादातून पानसरे यांचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली. आरोपीला जेजुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखा युनिट सहाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले आदींनी ही कारवाई केली.