टाटा मोटर्स कंपनीच्या पिंपरी प्रकल्पातील व्यापारी वाहन उद्योग विभाग शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस बंद ठेवण्यात आला आहे. औद्योगिक मंदीमुळे उत्पादन कमी झाल्याने बचतीच्या भूमिकेतून कंपनी व्यवस्थापनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
या विभागात ट्रक, टेम्पो, सुमो, सफारी आदी वाहनांचे उत्पादन केले जाते. गेल्या काही दिवसांपासून व्यापारी वाहन उत्पादन कमी होत चालले आहे. औद्योगिक मंदीमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हा विभाग दोन दिवस बंद ठेवण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बंद काळात पाणी, वीज, वाहतूक आदींच्या खर्चाची बचत होत असल्याचा युक्तिवाद व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in