कात्रज चौकात भरधाव वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. अपघातानंतर काही काळ कात्रज चौकात वाहतूक विस्कळीत झाली होती.कात्रज चौकातून नवले पुलाकडे जाणाऱ्या बाह्यवळण मार्गावर मंगळवारी दुपारी भरधाव वाहनाने एकाला धडक दिली. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा >>> पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार एनसीसीचे प्रशिक्षण

अपघातात मृत्युमुखी पडलेल्याची ओळख पटली नाही. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे वय अंदाजे ३० वर्ष आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड यांनी दिली. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन करुन कोंडी हटविली.

Story img Loader