बारामती : – बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ट्रॅक्टर यार्ड मध्ये एक ऊस वाहतूक करणारा बैलगाडीचा मालक हा आपला कितवा नंबर आहे, हे पाहण्यासाठी बैलगाडी सोडून शारदानगर येथे गेलेला परत येत असताना एका अज्ञात ऊस वाहतूक ट्रॅक्टर वाहनाच्या जोरात धक्क्या लागल्या मुळे हिरामण चरणदास चव्हाण (वय ४७) यांचा मृत्यू झाला आहे.

अज्ञात ट्रॅक्टरचा धक्का लागल्यामुळे या व्यक्तीचा अपघात झाला,हा अपघात झाल्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या चव्हाण यांना अज्ञात ट्रॅक्टर चालकाने माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या रुग्णवाहिकेच्या वाहनामधून उपचारासाठी रुई येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान या अपघाती जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला.

हा अपघात झाल्यानंतर हे सर्वं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला असता की बाब लक्षात येता ऊसतोड कामगारांनी तातडीने एकत्रित येऊन आक्रमक पवित्रा घेत मालेगाव साखर कारखान्यावरच आंदोलन सुरू केले. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ऊस वाहतूक कामगारांनी काटा बंद आंदोलन सुरू करून आंदोलना साठी ठिय्याच मांडला. दरम्यान, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी, संचालक यांनी या प्रकरणात लक्ष घातले या वेळी अज्ञात ट्रॅक्टर चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला जाणार आहे, या अपघात प्रकरणात सखोल चौकशी करून या प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

या अपघातामधील मयत व्यक्तीचा भाऊ विलास चरणदास चव्हाण, ( राहणार पिंपळखेड, तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव ) यांनी या अपघाता प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे, बारामती तालुक्यातील माळेगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, माळेगाव येथील सहाय्यक फौजदार संजय मोहिते हे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

Story img Loader