पुणे : मुळशी तालुक्यातील मानस लेकमध्ये मोटार कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

रामदास पवार (रा. आंबेगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी भूगाव परिसरातील मानस लेकमध्ये एक मोटार तरंगतना आढळून आली. स्थानिक रहिवाशांनी या घटनेची माहिती पौड पोलिसांना दिली. पौड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मुळशी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मोटार पाण्यावर तरंगत होती. पोलिसांनी घटनास्थळी क्रेन मागविली. क्रेनच्या सहायाने मोटार पाण्यातून बाहेर काढण्यात आली. मोटारीत एकजण असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मोटारीच्या काच फोडल्या. मोटारीतील व्यक्ती मृत असल्याचे उघडकीस. पोलिसांनी मोटारीतील पिशवीची पाहणी केली. तेव्हा मृतदेहाची ओळख पटली, अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.

हेही वाचा : जळगावात दुचाकी अपघातात वृद्धासह महिलेचा मृत्यू

पवार मित्रांसोबत मानस लेक परिसरातील हॉटेलमध्ये गेले होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते काही न सांगता हॉटेलमधून बाहेर पडले. तेथून परतत असताना मोटार मानस लेकमध्ये कोसळून दुर्घटना घडल्याची शक्यता आहे. पवार यांची मोटार मानस लेकमध्ये कोसळून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मित्रांना नव्हती, असे पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले.

Story img Loader