पिंपरीमध्ये उत्सुकतेपोटी मित्राची रिव्हॉल्व्हर बघत असताना त्यातून एक गोळी सुटल्यामुळे नंदन जोशी यांचा मृत्यू झाला. पिंपरीतील अजमेरा कॉलनीमध्ये हा प्रकार घडला.
सहा-सात मित्र हे अजमेरा कॉलनीमध्ये जमले होते. त्यावेळी राजन पटेल यांच्याकडील रिव्हॉल्व्हर उत्सुकतेपोटी बघण्यासाठी नंदन जोशी यांनी घेतली. रिव्हॉल्व्हर बघत असताना त्यातून एक गोळी सुटून ती जोशी यांच्या छातीत घुसली. या घटनेनंतर लगेचच त्यांना निरामय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जोशी हे ३४ वर्षांचे होते. ते पुण्यातील एरंडवणा भागातील राहात होते. पटेल यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय असून, त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हरचा परवानाही आहे. पोलीसांनी याप्रकरणी निष्काळजीपणाबद्दल पटेल यांना ताब्यात घेतले आहे.

Story img Loader