पुणे : एका मेंदुमृत व्यक्तीमुळे चार जणांना जीवनदान मिळाले आहे. त्याच्या दोन मूत्रपिंडांचे दोन जणांना प्रत्यारोपण करण्यात आले तर यकृताचे एका व्यक्तीला प्रत्यारोपण करण्यात आले. या तिन्ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यातील वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात झाल्या. याचवेळी हृदय प्रत्यारोपण चेन्नईतील रुग्णालयात करण्यात आले.

साताऱ्यातील सुनील निगडे (वय ५५) यांना बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलमध्ये मेंदुमृत म्हणून घोषित करण्यात आले होते. प्रत्यारोपण समन्वयक रेश्मा कुलावडे यांनी रुग्णाच्या कुटुंबीयांचे अवयव दानाविषयी समुपदेशन केले. कुटुंबाकडून संमती मिळाल्यानंतर विभागीय प्रत्यारोपण समन्वयक केंद्राने तत्काळ अवयवांच्या वाटपाचे काम सुरू केले. हृदयासाठी राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण समितीला कळवण्यात आले.

Testimony of Eknath Shinde regarding Malegaon district
दादा भुसे यांना दुप्पट मताधिक्य द्या, तुम्हाला मालेगाव जिल्हा देतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना

मेंदुमृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्याचे हृदय, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे दान करण्यास संमती दिली. या कुटुंबाने घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे गंभीर परिस्थितीतील चार रुग्णांचे प्राण वाचले.

-डॉ. भूषण नगरकर, प्रमुख, अतिदक्षता विभाग, मणिपाल हॉस्पिटल (बाणेर)

मेंदुमृत व्यक्तीचे एक मूत्रपिंड बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलमधील एका रुग्णाला देण्यात आले. दुसरे मूत्रपिंड पिंपरीतील डी. वाय.पाटील रुग्णलयातील रुग्णाला देण्यात आले. हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमधील रुग्णाला यकृत देण्यात आले. चेन्नईतील एमजीएम हॉस्पिटलमधील रुग्णाला हृदय पाठवण्यात आले. हृदयाचे हस्तांतरण करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. मणिपाल हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर आनंद धारसकर आणि त्यांच्या पथकाने एका रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण केले. तज्ज्ञ डॉ. तरुण जेलेका आणि त्यांच्या पथकाने या संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान मदत केली.