पिंपरी- चिंचवड मधील देहूरोड मध्ये गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी आहेत. ही घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. या घटनेचा एक सीसीटीव्ही समोर आला असून सीसीटीव्ही मध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांवर सराईत गुन्हेगार अंदाधुंद फायरिंग करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या घटनेमध्ये विक्रम गुरुस्वामी रेड्डी याचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री वाढदिवसाच्या दरम्यान ही घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून घडलेल्या घटनेमध्ये रेड्डी चा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेड्डी आणि त्याचा सहकारी हे दुचाकीवरून जात होते. त्याच दरम्यान समोर उभा असलेल्या सराईत गुन्हेगाराने त्यांच्यावर फायरिंग केली. याच दरम्यान विक्रम गुरु स्वामी रेड्डी चा मृत्यू झाला आहे. तर इतर एक जण गंभीर जखमी आहे. दरम्यान त्याआधी देखील सराईत गुन्हेगाराने मारामारी केली यात. नंदकिशोर यादव नावाचा व्यक्ती गंभीर जखमी आहे. त्याच्यावर देखील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही लागला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस सराईत गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.