तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावे बनावट आदेश तयार करून त्याआधारे हडपसर येथील वनविभागाची सुमारे दोनशे कोटी रुपये किमतीची सात हेक्टर जमीन बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. राकेश अशोक उफाळे (वय ३८, रा. पार्क इनफेनिया, भेकराईनगर, हडपसर) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत हवेलीच्या तहसीलदारांनी फिर्याद दिली होती. आरोपी उफाळे आणि याने साथीदारांशी संगनमत करुन हडपसर येथील सर्व्हे नं.६२ येथील सात हेक्टर ६८ आर या मिळकतीवर सात बारा कब्जेदारी मालकी हक्काने नावाची नोंद करण्याबाबतची मागणी महसूल मंत्र्यांकडे केली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in