लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: शहरातील एका नामवंत उपाहारगृहाकडून एका थाळीवर ग्राहकांना एक थाळी मोफत देण्यात येणार असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी एका महिलेला दोन लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले सायबर चोरटे मूळचे केरळचे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
software exports maharashtra
‘आयटी’त पुण्याचा झेंडा! सॉफ्टवेअर निर्यातीत मुंबई, नागपूरपेक्षा अव्वल कामगिरी

याबाबत त्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी प्रकाश कुमार (रा. मुन्नार, केरळ) याच्यासह साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला शुक्रवार पेठेत राहायला आहे. डेक्कन जिमखाना भागातील एका प्रसिद्ध उपाहारगृहाकडून एका थाळीवर ग्राहकांना दुसरी थाळी मोफत देण्यात येणार असल्याची फसवी जाहिरात समाजमाध्यमावर प्रसारित केली होती. महिलेच्या वडिलांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्यांनी बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. बँक खात्यातून एक लाख ९९ हजार रुपये लांबविण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव तपास करत आहेत.

Story img Loader