पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागातील भुयारी मार्ग परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे साताऱ्याकडे एक मार्गिका २ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. उर्वरित दोन मार्गिका आणि सेवा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहणार आहे.
बाह्यवळण मार्गावर वारजे भागात रोझरी शाळेजवळ भुयारी मार्ग आहे. भुयारी मार्गाजवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुरुस्तीचे काम (एक्सपान्शन जाॅईंट) सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे भुयारी मार्ग परिसरातील साताऱ्याकडे जाणारी एक मार्गिका २ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा : कात्रज भागात बसच्या धडकेने दुचाकीस्वारासह दोघांचा मृत्यू; दोन पादचारी जखमी
उर्वरित दोन मार्गिका, तसेच सेवा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी कळविले आहे.