पुणे : समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पर्वती टाकी ते जगताप हाऊस या दरम्यान नव्याने टाकलेल्या १ हजार ४७३ मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या काम पूर्ण झाले असून जलवाहिनी जोडणीची कामे येत्या सोमवारपासून (८ जानेवारी) हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे नवीन नाना पेठ, गंजपेठ, खडकमाळ आळीसह घोरपडे पेठेत सोमवारपासून एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार असून तो २२ जानेवारी पर्यंत कायम राहणार आहे. या भागाला ८०० मिलीमीटर व्यासाच्या पर्यायी जलवाहिनीतून एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ (प्रभाग क्रमांक १८), लोहियानगर-कासेवाडी (प्रभाग क्रमांक १९), ताडीवाला रस्ता-ससून हॉस्पिटल (प्रभाग क्रमांक २०) आणि सॅलीसबरी पार्क-महर्षीनगर (प्रभाग क्रमांक २८) या भागात एकवेळ पाणीपुरठा होणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.
हेही वाचा : मुदतीत पाणीपट्टी न भरल्यास किती दंड होणार? पुणे महापालिकेने केलं जाहीर
खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ प्रभागातील स्वारगेट पोलीस वसाहत, झगडेवाडी, खडकमाळ आळी, घोरपडी पेठ, मोमीनपुरा, टिंबर मार्गेट, महात्मा फुले पेठ, गंजपेठ, गुरूवार पेठ, धोबी घाट, खडक पोलीस वसाहत या भागाला एकवेळ पाणीपुरवठा होणार आहे. लोहियानगर, इनामकेमळा, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, काशिवाडी, गुरूनानक नगर, नेहरू रस्ता, भवानी पेठ परिसर, बालाजी आणि भवानी माता मंदिर परिसर, टिंबर मार्केट, नवीन नाना पेठ, हरकानगर, चुडामण तालीम, भगवानदास चाळ, वायमेकर चाळ, राजेवाडी, पत्राचाळ एसआरए, भवानी पेठ पोलीस वसाहत, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, पद्मजी सोसायटी, महिफिल वाडा, साठेवाडा, सायकल सोसायटी या भागालही एकवेळ पाणीपुरवठा होईल. तसेच मुकुंदनगर, व्हेईकल डेपो, अप्सरा टॉकीज परिसर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, सीपीडब्ल्यूडी क्वॉर्टर, रांका हॉस्पिटल परिसर, शंकरशेठ रस्ता एसटी स्टॅण्ड ते धोबी घाट परिसराची उजवी बाजू, मीरा सोसायटी, लक्ष्मी नारायण चौकीच्या मागील वस्ती आणि मित्र मंडळ कॉलनीतही एकवेळ पाणीपुरवठा होणार आहे.