पुणे : टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांचा बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरूळी देवाची परिसरात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. कृष्णा राहुल महतो असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी टँकरचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत बबीतादेवी राहुल महतो (वय २२, सध्या रा. उरुळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता, फुरसुंगी) यांनी हडपसर (काळेपडळ) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महातो दाम्पत्य सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरातील एका भंगार माल दुकानात कामाला आहेत. दुकानाच्या पोटमाळ्यावर ते राहायला आहेत. मंगळवारी (२१ जानेवारी) दुपारी तीनच्या सुमारास महातो यांचा एक वर्षांचा मुलगा कृष्णा भंगार माल दुकानाच्या समोरील मोकळ्या जागेत खेळत होता. त्याची आई बबीतादेवी यांनी त्याला चटईवर ठेवले होते. त्यावेळी तेथे आलेल्या पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली तो सापडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता तो पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One year old boy crushed to death by water tanker pune print news rbk 25 zws