पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्याने कांदा, मटार, शेवगा, बटाट्याच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून घेवडा आणि पावटा प्रत्येकी ३ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ५ टेम्पो शेवगा, राजस्थानातून १० टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून २० ट्रक मटार, तामिळनाडूतून १ टेम्पो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेशातून १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ६०० गोणी, भेंडी ७ टेम्पो, गवार ५ टेम्पो, टोमॅटो १० हजार पेटी, हिरवी मिरची ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, काकडी ५ टेम्पो, कोबी ५ टेम्पो, फ्लाॅवर १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांदा १०० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
Food stalls from IT Park to Mate Chowk have found new ways to avoid legal action
पदावरील खाद्यापदार्थ विक्रेत्यांची अशीही चलाखी उघड; पोलीस, महापालिकेनेच दाखवली पळवाट?
After soybeans price of cotton become big issue for farmers in Vidarbha
विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत
price of potatoes increased up to rs 10 per kg due to supply restrictions from west bengal
उत्तरेत ऐन थंडीत बटाटा तापला; पश्चिम बंगालने राज्याबाहेर बटाटा, कांदा विक्री, वाहतुकीस घातली बंदी

कोथिंबीर, मेथीच्या दरात घट

सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात घट झाली आहे. पालेभाज्यांच्या दरात घट झाल्याने मागणी वाढली आहे, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर दीड लाख जुडी, तसेच मेथीच्या ७० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- ४०० ते ८००, मेथी – ५०० ते ८००, शेपू – ५०० ते ७००, कांदापात- ८०० ते १२००, चाकवत – ४०० ते ७००, करडई- ३०० ते ७००, पुदिना – ३०० ते ८००, अंबाडी – ४०० ते ६००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ७००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ४००-६००, पालक- ८००-१५००. हरभरा गड्डी – ८०० ते १०००.

हेही वाचा – पुणे : वारजे भागात टोळक्याची दहशत; तरुणावर कोयते, कुऱ्हाडीने वार

हेही वाचा – पुणे : टोमणे मारल्याने बांधकाम मजुराचा खून करणाऱ्या एकाला जन्मठेप

लिंबू, डाळिंब, खरबूज, पपईच्या दरात वाढ

मार्केट यार्डातील फळबाजारात लिंबू, डाळिंब, खरबूज, पपई, सीताफळांच्या दरात वाढ झाली आहे. संत्री, चिकू, अननस, माेसंबीचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी जुन्या आणि नव्या बहरातील मोसंबी ३० ते ४० टन, संत्री ७० ते ८० टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई ३० ते ४० टेम्पो, लिंबे एक ते दीड हजार गोणी, कलिंगड १० ते १२ टेम्पो, खरबूज ५ ते ६ टेम्पो, चिकू एक हजार गोणी, पेरू ६०० ते ७०० प्लास्टिक जाळी (क्रेट),अननस ६ ट्रक, बाेरे ७०० गोणी, सीताफळ ८ ते १० टन अशी आवक झाली.

Story img Loader