पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आवक वाढल्याने कांदा-बटाट्याच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- पुणे : सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहित तरुणीची आत्महत्या; पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

Onion export decision delayed for three days due to technical reasons
कांदा निर्यातीचा निर्णय तांत्रिक कारणांमुळे तीन दिवसांपासून अधांतरी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
vegetable prices increased in pune marathi news
पुणे: भाज्या कडाडल्या, गौरी आगमनानिमित्त भाजी खरेदीसाठी बाजारात गर्दी
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
Permanent reservation, disabled persons,
दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसगाड्यांमध्ये कायमस्वरूपी आरक्षण
Coconut expensive due to Wayanad landslides Mumbai news
वायनाडच्या भूस्खलनामुळे सणासुदीला ‘श्रीफळ’ महाग
ST traffic disrupted in Nashik section due to agitation plight of passengers
आंदोलनामुळे नाशिक विभागात एसटी वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल
Growth in major sectors of india marathi news
देशातील प्रमुख क्षेत्रांतील वाढ जुलैमध्ये ६.१ टक्क्यांवर मर्यादित

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (१२ फेब्रुवारी) राज्य तसेच परराज्यांतून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, राजस्थानातून ७ ते ८ टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून मिळून १५ ते १६ टेम्पो मटार, गुजरातमधून २ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो घेवडा, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ८ ते १० ट्रक लसूण, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ४० ट्रक बटाटा आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा- “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा भाजपाने कधी निषेध केला नाही”, जयंत पाटलांची टीका; म्हणाले, “त्यांना..”

पुणे विभागातून सातारी आले १४०० ते १५०० गोणी, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, कोबी ७ ते ८ टेम्पो, ढोबळी मिरची ९ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो , कांदा १०० ट्रक अशी आवक झाली.


पालेभाज्यांची आवक वाढली

मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मुळे, कांदापात, पुदिना, चवळईच्या दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या सव्वा लाख जुडींची आवक झाली. मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. मागणीच्या तुलनेत पालेभाजांची आवक चांगली होत असून पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- पुणे: प्रत्येक उद्योजकाकडे संशयाने पाहिल्यास गुंतवणूक कशी येईल?

लिंबू, डाळिंब महाग

उन्हाचा चटका वाढू लागल्याने लिंबे आणि डाळिंबाच्या दरात वाढ झाली आहे. लिंबांना मागणी वाढल्याने लिंबांच्या दरात गोणीमागे १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली. अन्य फळांचे दर स्थिर आहेत. फळबाजारात लिंबू दीड ते दोन हजार गोणी, अननस ६ ट्रक, डाळिंब १५ ते २० टन, मोसंबी ४५ ते ५० टन, संत्री २० ते २५ टन, बोरे ५० गोणी, खरबूज ८ ते १० टेम्पो, पपई ४ ते ५ टेम्पो, पेरु ३०० ते ४०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स) असी आवक झाली.