खासगी शाळांची अर्जप्रक्रिया ऑनलाइन होऊनही पालकांना शुल्काचा भरुदड; मुलाखतींचा ससेमिरा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहरातील खासगी शाळांच्या प्रवेश प्रक्रियेची गडबड आता सुरू झाली असून त्याबरोबरच पालकांचे हालही सुरू झाले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा असतानाही प्रवेश प्रक्रिया अर्जासाठी पाचशे ते दीड हजार रुपयांचा भरुदड पालकांना सोसावा लागत आहे. त्याचप्रमाणे या वर्षीही मुलाखतींचा ससेमिरा पालकांच्या मागे लागलेलाच आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खासगी शाळांची पुढील शैक्षणिक वर्षांची (२०१७-१८) प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली आहे. बहुतेक सर्व शाळांचे पूर्वप्राथमिक वर्गाचे ऑनलाइन प्रवेश अर्ज उपलब्ध झाले असून प्राथमिक वर्गाचे अर्ज या महिनाअखेरीस उपलब्ध होणार असल्याचे शाळांच्या संकेतस्थळांवरून दिसत आहे. शाळांच्या प्रवेश प्रक्रियेबरोबरच मुलांना शाळेत टाकण्यासाठी प्रवेशोत्सुक पालकांची त्रेधातिरपीट सुरू झाली आहे. प्रवेशाचे वेळापत्रक सांभाळतानाच प्रत्येक शाळेच्या प्रवेश शुल्काचा भरुदड या वर्षीही पालकांना सोसावा लागत आहे.

ऑनलाइन प्रवेश अर्जासाठीही शुल्क

प्रवेश अर्जाबरोबर माहितीपुस्तकाची विक्री शाळांकडून करण्यात येत असे. माहितीपुस्तक तयार करण्यासाठी येणारा खर्च भरून काढण्यासाठी शुल्क आकारण्यात येत असल्याचे शाळांकडून सांगण्यात येत होते. आता बहुतेक सर्वच शाळांचे प्रवेश अर्ज हे ऑनलाइन आहेत. मात्र तरीही या अर्जासाठी शाळांकडून पाचशे ते दीड हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. काही शाळांनी अर्ज ऑनलाइन ठेवला असला तरीही माहिती पुस्तक विकत घेणे बंधनकारक केले आहे.

शिक्षण हक्क धाब्यावर

शिक्षण हक्क कायद्याने शाळा प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालकांच्या मुलाखती घेण्यावर बंदी घातली असली, तरीही शाळांनी या वर्षीही मुलाखतींचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांचा ‘कल तपासणे’, ‘प्रवेशपूर्व संवाद’, ‘विद्यार्थी आणि पालकांशी ओळख करून घेणे,’ ‘विद्यार्थ्यांची आवड पाहणे’, ‘विद्यार्थी शिकण्यासाठी योग्य आहे ना याची तपासणी’ अशा नावांखाली मुलाखतींची वेळापत्रके शाळेने लावली आहेत.

पालकांच्या आर्थिक कुवतीची चाचपणी

शाळांच्या प्रवेश अर्जात पालकांच्या वार्षिक मिळकतीच्या तपशिलाचा रकानाही दिसत आहे. त्याचप्रमाणे मुलाखतीच्या दरम्यान शाळेतील उपक्रमांसाठी किती मदत करू शकणार अशाप्रकारची माहितीही शाळांकडून घेतली जात असल्याचे पालकांनी सांगितले.

खर्चिक प्रवेश प्रक्रिया

खासगी शाळांची पूर्वप्राथमिक वर्गाची प्रवेश क्षमता मर्यादित असते. त्यामुळे हव्या असलेल्या शाळेत प्रवेश मिळेलच याची खात्री नसते. त्यामुळे एका वेळी तीन ते चार शाळांचे अर्ज विकत घेणे, प्रवेश प्रक्रिया शुल्क घेणे अशी प्रक्रिया करावी लागते. फक्त प्रवेश अर्ज भरण्यासाठी पालकांच्या खिशातून साधारण दीड ते दोन हजार रुपये खर्च होतात. त्यानंतर शाळांच्या मुलाखती, त्यासाठी वेळेचे आणि रजेचे नियोजन करावे लागते.

घराजवळच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा अर्ज मी मुलाला प्रवेश मिळावा म्हणून भरला आहे. अर्ज भरण्यासाठी शाळेकडून पाचशे रुपये शुल्क आकारण्यात आले. या शाळेत प्रवेश हवा आहे. मात्र, पर्याय हवा म्हणून इतर दोन शाळांचेही अर्ज भरले आहेत.  – स्वराली भांबरे

ज्या शाळेत प्रवेश हवा आहे त्याची प्रवेश प्रक्रिया मार्चमध्ये सुरू होत आहे. मात्र या शाळेतील प्रवेशासाठी खूपच स्पर्धा असते. फक्त त्यावर अवलंबून राहणे शक्य नाही म्हणून इतर दोन शाळांचे अर्ज भरले आहेत. या शाळांच्या प्रक्रिया आता सुरू आहेत. मिळेल त्या शाळेत प्रवेश निश्चित करणार.  – पूर्वा आगाशे