पिंपरी : ऑनलाइन करमणूक आणि चॅट जीपीटी हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नाही. रंगभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षाही भावनात्मक बुद्धिमत्ता महत्त्वाची असते. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा बाऊ करण्यापेक्षा ते तंत्रज्ञान समजून घेतच उपयोग करणे गरजेचे आहे, असा सूर शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनातील ‘ऑनलाइन एन्टरटेन्मेंट आणि चॅट जीपीटी’चा रंगभूमीवर परिणाम होतोय का?’ या विषयावरील चर्चासत्रात रविवारी उमटला.

या चर्चासत्रात सहभागी ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे आणि लेखक नीरज शिरवईकर यांच्याशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे यांनी संवाद साधला. नाट्यसंमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष किरण येवलेकर, तळेगाव शाखेचे सुरेश धोत्रे, जयराज काळे या वेळी उपस्थित होते.

Loksatta kutuhal Artificial Intelligence and Power Supply
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विद्युत पुरवठा
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Loksatta editorial Dr Babasaheb Ambedkar Lok Sabha Elections Constitution Convention
अग्रलेख: कोणते आंबेडकर?
Loksatta chaturang bhaybhyti Fear Fear Sound Bhutan Sikkim Tourism
‘भय’भूती : भीतिध्वनी
Inquiry into cases in Beed Parbhani through retired judges Nagpur news
बीड, परभणीतील प्रकरणांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
importance of stability in life
सांधा बदलताना : मैत्र जीवांचे…
treatment personality disorders
स्वभाव-विभाव : विकारांतून मुक्ती
Loksatta kutuhal Artificial omnidirectional intelligence
कुतूहल: कृत्रिम सर्वसमावेशक बुद्धिमत्ता

हेही वाचा >>>ढोकळा खायला बुलेट ट्रेनची गरज कशाला? राज ठाकरे यांचा टोला

केंकरे म्हणाले, या तंत्रज्ञानामुळे क्षणिक काळाचे नाटककार तयार होतील अशी भीती आहे. मात्र, असे लेखक फार काळ टिकणार नाहीत. लेखकाच्या सृजनशीलतेला पर्याय नाही. रंगभूमीवर होणारे प्रयोग हे केवळ नाटककारच करू शकतात. नाटक आणि चित्रपट ही टिकाऊ गोष्ट आहे याची जाणीव लेखकाला असेल तर हे तंत्रज्ञान धोका होऊ शकत नाही.बर्वे म्हणाले, करोना काळात कलाकार निराशेच्या गर्तेत जाऊ नये, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी आम्ही ऑनलाइन नाट्यस्पर्धा घेतली होती. पण, आता प्रेक्षक नाट्यगृहात परत आले. रंगभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा भावनिक बुद्धिमत्तेला अधिक महत्त्व आहे.

शिरवईकर म्हणाले, चॅट जीपीटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे साचेबद्ध माध्यम आहे. त्यामुळे चांगल्या लेखकांनी याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घ्याव्या. हे तंत्रज्ञान वापराचे भान आले तर लेखकांना मदतच होईल.

Story img Loader