पुणे : शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवल्यास अल्पावधीत चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून शहरात घडलेल्या तीन घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी तब्बल ९० लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. याप्रकरणी कोथरुड, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरुड पोलीस ठाण्यात सुनील राजाराम टेंबे (वय ६३, रा.पौड रस्ता) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांची १ मार्च ते ४ मे या कालावधीत ३७ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. तक्रारदार यांच्याशी अनाेळखी व्यक्तींनी संर्पक करून ‘व्हॉटसअप डी-३ आयसीआयसीआय सेक्युरिटी ऑफिशियल स्टॉक’ या समूहामध्ये जोडून घेतले. त्यांना एक लिंक पाठवून आरोपींनी उपयोजन (ॲप) डाऊनलाेड करण्यास सांगितले. त्यात बँक खाते तयार करण्यास सांगून त्यावर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याच्या माध्यमातून किरकोळ रक्कमेचा तक्रारदार यांना गुंतवणुकीवर परतावा दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा