लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : तैवानला पाठविलेले पार्सल मुंबईत नार्कोटिक्स विभागाने पकडले आहे. त्याची पडताळणी करण्यासाठी नार्कोटिक्स विभागाला फोन जोडल्याचे सांगून महिलेला स्काईपवरून व्हिडीओ कॉल करण्यात आला. महिलेला बँकेचे उपयोजन चालू करण्यास सांगितले. त्याद्वारे महिलेच्या नकळत १९ लाखाचे कर्ज मंजूर करून ती रक्कम वळती करून घेत फसवणूक केली.

महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोबाईल धारक आकाश कुमार, अमनी कोंडाल, कर्ज वळती करून घेतलेले बँक खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेला आकाश नावाच्या व्यक्तीने फोन करुन तैवानमध्ये पाठवलेले पार्सल मुंबई येथील नार्कोटीक्स विभागामध्ये अडकले असल्याचे सांगितले. फोन नार्कोटिक्स विभागाला जोडत असल्याचे सांगून महिलेचे बँक खाते तपासायचे आहे, असे सांगितले.

आणखी वाचा-पुणे : सावधान! वाहतुकीचा नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना होतोय रद्द

महिलेला स्काईपवरून व्हिडिओ कॉल करून त्यांची कागदपत्रे व बँक खात्याची माहिती घेतली. महिलेला बँकेचे उपयोजन उघडायला लावून त्यांच्या नकळत १९ लाख ४ हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढले. पैसे महिलेच्या खात्यावर येताच त्यांनी बेनिफिशरी बँक खात्यावर वळती करून घेतले. पोलीस निरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online fraud of loan with women in pune by video call pune print news ggy 03 mrj