परदेशी शिक्षण संस्थांच्या सहकार्याने ऑनलाइन पीएच.डी. अभ्यासक्रमांची जाहिरात एज्युटेक कंपन्यांकडून करण्यात येत आहे. मात्र ऑनलाइन पीएच.डी.ला मान्यता नसल्याचा इशारा देत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यापूर्वी पडताळणी करण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) स्पष्ट केले.
यूजीसीकडून या संदर्भातील निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. पीएच.डी.ची गुणवत्ता राखण्यासाठी युजीसी (एम.फिल., पीएच.डी. पदवी देण्यासाठीचे किमान निकष आणि प्रक्रिया) अधिनियम २०१६ प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>>पुणे : कौटुंबिक वादातून अल्पवयीन विवाहित युवतीचा खून , लोहगावमधील घटना ; पतीला अटक

देशभरातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना या नियमांचे आणि त्यातील बदलांचे पालन करणे बंधनकारक आहे. परदेशी शिक्षण संस्थांच्या सहकार्याने ऑनलाइन पीएच.डी. अभ्यासक्रमांबाबतच्या एज्युटेक कंपन्यांच्या जाहिरातींना विद्यार्थ्यांनी बळी पडू नये. अशा ऑनलाइन पीएच.डी. अभ्यासक्रमांना यूजीसीची मान्यता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रम युजीसी अधिनियम २०१६ नुसार असल्याबाबत सत्यतेची पडताळणी केल्याशिवाय प्रवेश घेऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader