महाविद्यालयांनी गुण सादर न के ल्याने निकाल अपूर्ण असल्याचे विद्यापीठाचे स्पष्टीकरण

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षांच्या निकालामध्ये काही विषयांबाबतीत अ‍ॅव्हेलेबल (एनए) शेरा दिसत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सत्र परीक्षांचा निकाल विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी असून, महाविद्यालयांकडून अंतर्गत आणि प्रात्यक्षिकांचे गुण आल्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल, विद्यार्थ्यांनी निकालाबाबत चिंता करण्याचे कारण नाही, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.

विद्यापीठाने ऑनलाइन बहुपर्यायी स्वरुपातील प्रॉक्टर्ड परीक्षा १० एप्रिलपासून घेतल्या. या परीक्षांचे निकाल विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले. या निकालामध्ये काही विषयांच्या गुणांमध्ये एनए असा शेरा देण्यात आल्याचे आढळल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ऑनलाइन परीक्षा देऊनही गुणांमध्ये एनए शेरा दिसत असल्याने विद्यार्थ्यांकडून परीक्षा व मूल्यमापन मंडळाला प्रश्न विचारले जात आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, की काही विषयांना अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षा आहेत. दोन्ही सत्रांसाठी या अंतर्गत, प्रात्यक्षिक परीक्षा एकत्रित घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी अंतर्गत मूल्यमापन, प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण विद्यापीठाला सादर करणे आवश्यक आहे. अद्याप काही महाविद्यालयांनी गुण पाठवलेले नाहीत. त्यामुळे काही विषयांच्या गुणांमध्ये एनए शेरा दिसत आहे. लेखी परीक्षेच्या गुणांमध्ये अंतर्गत, प्रात्यक्षिकांचे गुण आल्यावर निकाल परिपूर्ण होईल. ऑनलाइन परीक्षांचा प्रसिद्ध निकाल के वळ विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आहे. महाविद्यालयांकडून गुण आल्यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत गुणांबाबत वेळोवेळी परिपत्रके  प्रसिद्ध के ली आहेत. त्यामुळे महाविद्यालयांना गुण सादर करण्यासाठी २५ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

महाविद्यालयांकडून विद्यापीठाकडे बोट…

विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत गुणांबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाकडे विचारणा के ल्यावर महाविद्यालयांकडून विद्यापीठाकडे बोट दाखवले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडे समस्या मांडाव्या लागत आहेत. त्यामुळे महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.