आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर हे तरुणांसोबत संवाद साधण्यासाठी ‘फेसबुक’ चा वापर करणार असून, २३ जूनपासून ‘फेसबुक’वर ‘ऑनलाइन’ अध्यात्माचे धडे देणार आहेत.
फेसबुकचा परिवर्तनासाठी अर्थपूर्ण संवादाचे साधन म्हणून वापर करण्यात येणार आहे. फेसबुकवर होणाऱ्या कार्यक्रमांचे चार भाग असणार आहेत. रविशंकर यांचे वैयक्तिक जीवन, यश आणि सृजनशीलता, जागतिक प्रश्न, प्रेम आणि नातेसंबंध हे चार भाग असतील. या कार्यक्रमांमधून श्री श्री रविशंकर जगभरातील तरुणांशी संवाद साधतील. ते लोकांकडून ऑनलाइन ध्यानही करून घेणार आहेत. तसेच विविध प्रश्नांची उत्तरेही देतील. याशिवाय प्रत्येक भागात काही रंजक प्रसंग, कार्टूनची चित्रफीत, व्हिडिओ चित्रीकरण असेल. त्यासाठी
http://www.youtube.com/watch?v=h8yFqtdanuQ, http://www.youtube.com/watch?v=9NC2IO6qlpE, http://www.youtube.com/watch?v=M7a-0grleh8
या लिंक्सवर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.