लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य सरकारने रास्त भाव धान्य दुकानांमधून आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली. मात्र, आतापर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांत केवळ १३ टक्के, तर उर्वरित ग्रामीण भागात ६५ टक्के शिधाचे वाटप करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी अद्यापही वंचित राहिले असून ‘आनंदाचा शिधा’ला दिरंगाईचे विरजण पडले आहे.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
dcm devendra fadnavis criticized congress mla ravindra dhangekar
‘कसब्या’तील आमदारांची कामे कमी आणि दंगा जास्त; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका
Narendra Modi statement regarding the middle class in a meeting in Pune news
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो’; पुण्यातील सभेत विधान
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यात अंत्योदय व प्राधान्य योजनेतील लाभार्थींना १०० रुपयांत एक लिटर तेल, एक किलो रवा, एक किलो हरभरा डाळ, एक किलो साखर मिळणार आहे. दिवाळीलादेखील असा शिधा वाटण्यात आला होता. त्यासाठी एकाच खासगी यंत्रणेला पुरवठ्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यामुळे राज्यभर हा शिधा पोचण्यात अडचणी आल्या होत्या. आता मात्र राज्य सरकारने जास्तीच्या यंत्रणा नेमल्या आहेत. मात्र, निविदा अंतिम करण्यात विलंब झाल्याने गुढी पाडव्याला हा शिधा मिळण्यास अडचणी आल्या होत्या. त्यामुळे डॉ. आंबेडकर जयंतीपर्यंत शिधा वाटप पूर्ण करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात बुधवारपर्यंत (१२ एप्रिल) पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ १३ टक्के, तर ग्रामीण भागात ६५ टक्के लाभार्थींपर्यंतच हा शिधा पोहोचला आहे.

आणखी वाचा- पुणे: जिल्ह्यातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या

याबाबत बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने म्हणाल्या, ‘आनंदाचा शिधा वाटपाचे काम जिल्ह्यात ६५ टक्के झाले आहे, तर शहरात विलंबाने सुरुवात करण्यात आल्याने अद्याप बरेच वाटप बाकी आहे. ग्रामीण भागात पाच लाख ६१ हजार ९३ लाभार्थी असून मार्च महिन्यात एक लाख ८३ हजार २१९, तर एप्रिल महिन्यात आतापर्यंत एक लाख ८२ हजार ५३४ अशा एकूण तीन लाख ६५ हजार ७५३ शिधापत्रिकाधारकांना शिधा वाटप करण्यात आला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी दोन दिवसांत जास्तीत जास्त शिधा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’

जिल्ह्यात शिधा लाभार्थींची संख्या पाच लाख ६१ हजार
शहरात तीन लाख १७ हजार लाभार्थी
जिल्ह्यात १८२३, शहरात ६९९ रास्त भाव धान्य दुकाने

स्वतंत्र अधिकारी नसल्याचा फटका

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांचा भाग शहर अन्नधान्य वितरण विभागाच्या अखत्यारित येतो. स्वतंत्र अधिकारीच नसल्याने या विभागाचा कार्यभार जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडेच बुधवारपर्यंत होता. गुरुवारपासून नवे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यभार स्वीकारणार आहेत. त्याचा फटका पुणे, पिंपरी-चिंचवडमधील लाभार्थींना बसला आहे. या दोन्ही शहरांत मिळून तीन लाख १७ हजार लाभार्थी असून त्यापैकी केवळ ४१ हजार ९६० जणांनाच आतापर्यंत आनंदाचा शिधा प्राप्त झाला आहे.