लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे: यंदाच्या मे महिन्यात पुणे शहर आणि परिसरात फक्त १९.४ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. महिनाभरात फक्त पाच दिवसच हलका पाऊस झाला इतर दिवस कोरडे गेले, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मे महिन्यात चार दिवस हलका पाऊस झाला. महिनाभरात एकूण १९ मिलीमीटर पाऊस झाला. चार मे रोजी ४.५, सात मे रोजी ०.६, आठ मे रोजी ०.१, नऊ मे रोजी ९.२ आणि ३० मे रोजी ५ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
हेही वाचा… मुळशी तालुक्यातील ‘हे’ गाव होणार कार्बनमुक्त
मे महिन्यात पुण्यात पडणाऱ्या पावसाबाबत कायमच अनियमितात राहिली आहे. २०२२च्या मे महिन्यात फक्त एकच दिवस २० मे रोजी ०.७ मिलीमीटर पाऊस पडला होता. २०२१मध्ये मे महिन्यात ८८.८ इतका पाऊस पडल्याची नोंद झाली होती. त्यावर्षी मे महिन्यांत १३ दिवस पाऊस पडला होता. २०१३ पासून मे महिन्यात सर्वाधिक तेरा दिवस पाऊस २०२१मध्ये झाला होता. २०२०मध्ये एकूण ३४.८ मिमी पाऊस पाच दिवसांत पडल्याची नोंद आहे.
२०१५च्या मे महिन्यात ११२.७ मिमीची नोंद
२०१३ ते २०२३ या काळाचा विचार करता पुण्यात २०१५मध्ये मे महिन्यात सर्वाधिक ११२.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. सहा दिवसांत हा पाऊस झाला होता. पण, १४ मे २०१५ रोजी एकाच दिवसात पुण्यात १०२.८ मिमी पाऊस पडला होता. या दिवशी पुणे अक्षरक्षः जलमय झाले होते. पुण्यात झाडे, घरांच्या पडझडीच्या, नुकसानीच्या अनेक घटना घडल्या होत्या. २०१३ आणि २०१९मध्ये मे महिन्यात पुण्यात अजिबात पाऊस पडला नव्हता. या दोन्ही वर्षी संपूर्ण मे महिना कोरडा गेला होता.