लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरण परिसरात अद्यापही पावसाचा जोर वाढला नाही. जून महिना कोरडाच गेला. धरण परिसरात केवळ २९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात १८ टक्के पाणीसाठा आहे. तूर्तास पाणी कपातीची आवश्यकता नाही. पण, पावसाने ओढ दिल्यास पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागेल, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

rain forecast for two days in vidarbha central maharashtra
विदर्भ, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा अंदाज; जाणून घ्या, बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’
way to reduce human-wildlife conflict is through Chandrapur says Forest Minister Ganesh Naik
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच – वनमंत्री
imd predicted possibility unseasonal rains in maharashtra
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट! ; हवामान खाते…
delhi fog flights stuck
दिल्लीत धुक्याची चादर, दृश्यमानता शून्यावर, १०० विमानांचा खोळंबा
Mumbais air quality is poor According to Sameer app
शिवाजीनगर घुसमटलेलेच
Minimum temperature in Mumbai , Mumbai temperature drops ,
मुंबईतील किमान तापमानात ४ अंशांनी घट

शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. शहराची भिस्त पवना धरणावर जास्त आहे. पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढल्याने समान पाणीपुरवठ्याचे कारण देत महापालिका प्रशासनाने २५ नोव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. काही दिवसांसाठी सुरू केलेला असा पाणीपुरवठा साडेचार वर्षे झाले, तरी कायम आहे. शहराच्या लोकसंख्यावाढीचा वेग आणि सन २०४५ पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिका आंद्रा व भामा आसखेड धरणातून २६७ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत आठ हेक्टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.

आणखी वाचा-अजित पवार गटाबरोबर भाजपचे दहा माजी नगरसेवक शरद पवार गटात येणार! शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाचा दावा

आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागांतील रहिवाशांना देण्यात येत आहे. परंतु, वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडत असून, तक्रारींमध्ये वाढ होत आहे. शहराची पवना धरणावर सर्वाधिक भिस्त आहे. परंतु, जून महिन्यात धरण परिसरात जोरदार पाऊस झाला नाही. दि. १ जूनपासून २९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पाणीसाठा १८.१४ टक्के आहे. हा साठा २० जुलैपर्यंत पुरेल एवढाच आहे. परंतु, धरण परिसरात अद्याप पावसाचा जोर वाढलेला नाही. गतवर्षी आजमितीला २०.१६ टक्के पाणीसाठा होता. तर, ४२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तीन दिवसांपासून धरण क्षेत्रात हलका पाऊस पडत आहे. मात्र, मोठ्या पावसाची अद्याप प्रतीक्षाच आहे. जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्यास पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा-पुणे : विशाल अगरवालला आणखी एका गुन्ह्यात अटक

जून महिन्यात धरण परिसरात अपेक्षित पाऊस झाला नाही. अद्यापही पावसाचा जोर वाढलेला नाही. त्यामुळे धरणात येवा सुरू झाला नाही. १५ जुलैपर्यंत पाणीसाठा पाहून कपातीबाबत नियोजन करणे आवश्यक आहे, असे पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया म्हणाले.

तूर्तास पाणीकपातीची आवश्यकता नाही. पण, पावसाचा अंदाज घेऊन परिस्थितीनुसार पाणीकपातीबाबतचा निर्णय घेण्यात येईल. जुलैमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Story img Loader