लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून सकाळपासून या मतदार संघात संथ गतीने मतदान सुरू आहे. मतदानाला सुरुवात झाल्यापासून पहिल्या दोन तासात या हडपसर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देण्याची परंपरा या मतदारसंघाची आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील ही ‘परंपरा ‘ कायम राहणार की ‘ इतिहास ‘ बदलणार याकडे लक्ष लागले आहे. मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून पहिल्या दोन तासात या मतदारसंघात ४.४५ इतके टक्के मतदान झाले.

Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
mumbai This election polling stations increased and started in housing societies to avoid evening crowding
साडेसहाशे गृहनिर्माण संस्थांमध्ये होणार मतदान, मुंबईत प्रथमच मोठ्या स्तरावर प्रयोग, मतदान वाढण्याची अपेक्षा
65 percent voter turnout recorded in first phase of jharkhand assembly polls
पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष
Nashik Voting, satellite phone, polling stations in Nashik district , Nashik latest news,
मतदानाच्या माहितीसाठी १० उपग्रहाधारित फोन, ८८ धावपटूंचा वापर, नाशिक जिल्ह्यात १०३ मतदान केंद्र संपर्कहिन
Datta Meghe in Vidarbha politics is out of election for first time
विदर्भाच्या राजकारणातील ‘भीष्माचार्य’ प्रथमच निवडणूक चक्राबाहेर
Rajan Vikhare, demands CCTV system
मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची मागणी
Belapur, Airoli, voters, society Belapur,
१५ हजार मतदारांचे सोसायटीतच मतदान, बेलापूरमध्ये १२ तर ऐरोलीत २ गृहसंकुलांत केंद्रे

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वात मोठा मतदार संघ अशी ओळख हडपसर मतदारसंघाची आहे. या मतदारसंघात ६ लाख २५ हजार ६७५ मतदार आहेत. यापैकी पुरुष मतदारांची संख्या ३ लाख २८ हजार ०८२ इतकी तर महिला मतदारांची संख्या २ लाख ९७ हजार ५१५ इतकी आहे. पाच वर्षांपूर्वी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात ४७.२३ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या वर्षी मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्यासाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात आले आहेत.

आणखी वाचा-पैसे वाटपाच्या आरोपानंतर पर्वतीत पहिल्या दोन तासांत काय घडलं ? जाणून घ्या अपडेट्स…

सर्वात मोठा मतदार संघ असलेल्या हडपसर मधील मतदार प्रत्येक निवडणुकीमध्ये नवीन चेहऱ्याला संधी देतात असा आतापर्यंतचा अनुभव आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार चेतन तुपे हे सध्या येथील विद्यमान आमदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत तुपे यांनी भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता. तर २०१४ च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांचा भाजपचे टिळेकर यांनी पराभव केला होता. २००९ मध्ये शिवसेनेचे बाबर या मतदारसंघातून निवडून आले होते. एकाच उमेदवाराला दोन वेळा आमदार होण्याची संधी या मतदारसंघात मिळालेली नाही, ही येथील परंपरा राहिलेली आहे.

या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी ( अजित पवार) पक्षाचे आमदार चेतन तुपे, महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने माजी महापौर प्रशांत जगताप यांना संधी दिली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शहरप्रमुख साईनाथ बाबर, तर अपक्ष म्हणून गंगाधर बधे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीकडून माजी आमदार महादेव बाबर इच्छुक होते. मात्र ही जागा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला देण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. अपक्ष उमेदवार बधे यांना आमदार बाबर यांनी पाठिंबा दिला असून त्यांच्या प्रचारात ते विशेष सक्रिय होते.

आणखी वाचा-पुणेकरांनो, कमी मतदानाची परंपरा आज इतिहासजमा करा!

या मतदारसंघात मराठा, माळी, मुस्लिम समाजाचे तसेच मराठवाड्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यांचे पाठबळ ज्या उमेदवाराच्या मागे राहील, तो येथून आमदार म्हणून विजयी होणार आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी जेष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे, वसंत मोरे यांच्या सभा झाल्या. तुपे यांच्या प्रचारात माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह महायुतीच्या नेत्यांचा सहभाग होता. साईनाथ बाबर यांच्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे जाहीर सभा घेतली. तर अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्यासाठी माजी आमदार महादेव बाबर मैदानात उतरले आहे.