वाव मात्र रस्ते ‘अरूंदीकरणा’ला
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उड्डाणपूल, पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्गाबरोबरच महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि योजना वर्षभरापूर्वी प्रस्तावित करण्यात आल्या. मात्र वाहतूक सुधारणेच्या या सर्व वल्गनाच ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्षांअखेरीस काही योजना अडखळत का होईना सुरू झाल्या असल्या तरी वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्याऐवजी पदपथ विकसित व सुशोभिकरणाच्या नावाखाली प्रमुख रस्त्यांचे अरुंदीकरण करण्याचा घाट घालत वाहतूक कोंडीत भरच घातली आहे.
महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठीच्या अंदाजपत्रकामध्ये शाश्वत वाहतुकीवर भर देण्यात आला होता. वाहतूक सुरक्षित आणि जलद गतीने होण्यासाठी वाहनतळ, पादचारी मार्ग, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपुलांची उभारणी करण्याचे नियोजन अंदाजपत्रकात करण्यात आले होते. याशिवाय बीआरटी मार्ग सुरू करणे, पीएमपीसाठी गाडय़ांची खरेदी करण्यालाही प्राधान्य देण्यात आले होते.
विनासायास, जलदगतीने प्रवास करता यावा यासाठी उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग, तळजाई टेकडी बोगदा, बालभारती- पौड रस्ता, शिवणे-खराडी नदीकाठच्या रस्त्याची कामे पूर्ण करण्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात हे प्रकल्प कागदावरच राहिल्याचे दिसून येते. या सर्व प्रकल्पांसाठी मिळून किमान २२५ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली होती. मात्र हे प्रकल्प पूर्ण होणार नाहीत हे लक्षात येताच प्रकल्पांसाठी राखीव असलेला निधी प्रभागातील अन्य विकासकामांसाठी वळविण्यात आला. उच्च क्षमता द्रुतगती मार्गाच्या सल्लागाराची नियुक्ती झाल्यानंतर कोणता आर्थिक पर्याय स्वीकारायचा याचा निर्णय न झाल्यामुळे सात हजार ५०० कोटींच्या या प्रकल्पाला गती मिळू शकली नाही. सिंहगड रस्ता आणि सहकारनगर, पद्मावती, पर्वती हा भाग एकमेकांना जोडण्यासाठी तळजाई टेकडीपासून सिंहगड रस्त्याला जोडणारा बोगदा विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित करण्यात आली. पण ती कागदावरच राहिली. चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासाठी भूसंपादन करताना प्रशासनाच्या नाकीनऊ आले. भूसंपादनासाठी अन्य प्रकल्पांचा निधी प्रशासनाला घ्यावा लागला. बालभारती-पौड फाटा रस्त्याचे पर्यावरणीय मूल्यांकन परिणामता अहवाल करण्याची प्रक्रिया सुरू झाली, पण त्यासाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली नाही.
सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल प्रस्तावित केला होता. राजाराम पूल ते फनटाईम या रस्त्यावर होणाऱ्या या उड्डाणपुलासाठीची कार्यवाही वेळेत सुरू होऊ न शकल्याने उड्डाणपुलासाठीचा १० कोटींचा निधी प्रभागातील कामांसाठी वापरला. हीच परिस्थिती बीआरटी मार्गाबाबतही दिसून आली. आळंदी आणि नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग सक्षमपणे सुरू करण्यास अडचणी निर्माण झाल्या, तर तब्बल ७५ कोटी रुपये खर्चून सातारा रस्ता बीआरटी मार्ग पुनर्रचनेचा गवगवा करण्यात आला.
निधी असूनही वापर नाही
एका बाजूला मोठय़ा प्रकल्पांना गती देण्याच्या कामात पथ आणि वाहतूक प्रकल्प नियोजन विभाग अपयशी ठरत असताना दुसऱ्या बाजूला पादचारी सुरक्षिततेच्या नावाखाली रस्ते अरूंदीकरण करण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. अर्बन स्ट्रीटच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कामे करताना जंगली महाराज रस्ता, फग्र्युसन रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर, कुमठेकर आणि लक्ष्मी रस्ता अरूंदच करण्यात आला आहे. त्यातून वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहे. पदपथ विकसित करण्यासाठी ४० कोटी रुपयांचा निधी असतानाही पुरेशा प्रमाणात पदपथ विकसित होऊ शकलेले नाहीत. शहरातील ७५ टक्के रस्त्यांना पदपथच नसल्याची कबुली पालिकेला द्यावी लागली आहे. त्यामुळे अंदाजपत्रकात निधी असूनही वाहतूक सुधारणेच्या नुसत्या वल्गना झाल्याचे स्पष्ट झाले.