केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया वीकअंतर्गत देशभरातील विविध सॉफ्टवेअर आणि योजनांचे उद्घाटन बुधवारी (१ जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे होणार असून, त्यात पुण्यातील सी-डॅक या संस्थेच्या ‘ई-हस्ताक्षर’ या सॉफ्टवेअरचाही समावेश आहे.
सी-डॅकतर्फे (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कम्प्युटिंग) विकसित करण्यात आलेल्या ‘ई-हस्ताक्षर’मुळे इंटरनेट वापरणाऱ्यांना ऑनलाईन हस्ताक्षर करता येणार आहेत, अशी माहिती सी-डॅकचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबानी यांनी दिली. इंटरनेट वापरकर्त्यांजवळ वैध आधार कार्ड क्रमांक तसेच नोंदणीकृत मोबाइल नंबर असल्यास ‘ई-हस्ताक्षर’ उपक्रमात त्यांना सहभागी होता येणार आहे. सी-डॅकतर्फे २, ३ आणि ६ जुलै रोजी दुपारी २.३० ते ४.३० या वेळात ‘डिजिटल टेक्नॉलॉजी अॅण्ड इनोव्हेशन’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ०२०-२५७०४१०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सी-डॅकच्या ‘ई-हस्ताक्षर’चे पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील सी-डॅक या संस्थेच्या ‘ई-हस्ताक्षर’ या सॉफ्टवेअरचे उद्घाटन दिल्ली येथे होणार अाहे.
First published on: 01-07-2015 at 03:08 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening of e sign by pm