शहरातील पोलिसांच्या घराचा प्रश्न मार्गी लागला असून लोहगाव येथील महाराष्ट्र मेगासिटी गृहप्रकल्पाचे रविवारी उद्घाटन होणार आहे. या गृहप्रकल्पात पाच हजार २४८ सदनिकांचे पोलिसांना वाटप केले जाणार आहे.
बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉल येथे रविवारी दुपारी दोन वा. सदनिका वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, गृहराज्यमंत्री राम शिंदे, खासदार अनिल शिरोळे, माजी गृहराज्यमंत्री बंटी पाटील, महापौर दत्ता धनकवडे हे उपस्थित राहणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून लोहगाव येथे पोलिसांच्या मेगासिटी प्रकल्पाचे काम सुरू होते. ११५ एकर परिसरात सध्या कर्तव्यावर असलेल्या पोलिसांबरोबरच निवृत्त पोलिसांनाही घरे मिळणार आहेत. या प्रकल्पात पाच हजार २४८ सदनिकांचे पोलिसांना वाटप केले जाणार आहे.

Story img Loader