शहरातील मोकळ्या जागा मोकळ्याच राहणे शहरासाठी अत्यंत आवश्यक आहे. मोकळ्या जागांचे महत्त्व लक्षात घेऊन शहरातील मोकळ्या जागा मोकळ्याच राहतील यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केली.
कात्रजचे नगरसेवक वसंत मोरे यांच्या प्रयत्नातून कात्रज तलाव परिसरात फुलराणी सुरू करण्यात येत असून या फुलराणीचे उद्घाटन शनिवारी राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, मनसेचे महापालिकेतील गटनेता बाबू वागसकर, मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे, स्थानिक नगरसेवक वसंत मोरे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
शहराचे पर्यावरण तसेच मोकळ्या जागांचे महत्त्व या विषयावर ठाकरे यांनी भाषणातून अपेक्षा व्यक्त केल्या. शहरातील मोकळ्या जागांचे महत्त्व लक्षात घेऊन त्या मोकळ्या राहण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे ते म्हणाले. कात्रज येथील फुलराणीच्या प्रकल्पाला एक कोटी ३२ लाख रुपये खर्च आला असून फुलराणीच्या मार्गाची लांबी ४२७ मीटर आहे. फुलराणीला इंजिन आणि चार डबे आहेत आणि एकावेळी ६४ जण या गाडीतून फिरण्याचा आनंद घेऊ शकतील. फुलराणीच्या मार्गावर एक बोगदाही असून गेले वर्षभर हे काम सुरू होते. प्रौढांसाठी वीस आणि लहानांसाठी १० रुपये असा तिकीट दर ठेवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा