विधानभवनाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. इमारत चांगली झाली आहे; त्याबरोबरीने आता कामाचा दर्जा सुधारा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केली. शहरांलगतच्या छोटय़ा नगरातील विकास नियोजनबद्ध व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
विधानभवन येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त विकास देशमुख, अपर आयुक्त श्याम देशपांडे, आमदार भीमराव तापकीर, स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे, सभागृहनेते सुभाष जगताप या वेळी उपस्थित होते.
राज्यातील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी निधीची तरतूद केली जाणार असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले,की मुंबई आणि नागपूर येथील जिल्हा नियोजन समितींना ऐतिहासिक इमारतींच्या संवर्धनासाठी २५ कोटी रुपये दिले आहेत. पुणे जिल्ह्य़ामध्येही अशा अनेक इमारती आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव पाठविला तर निधीची तरतूद करता येईल.
वळसे-पाटील म्हणाले,‘‘ राज्यातील शहरांचा विकास गतीने होत असल्यामुळे शहरालगतची छोटी गावेही विकसित होत आहेत. पण, येथील विकासाला नियोजन नाही. हे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी एमआरटीपी अॅक्टमध्ये सुधारणा केली जाणार आहे.’’
इमारत चांगली झाली आहे, कामाचा दर्जा सुधारा – अजित पवार
विधानभवनाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. इमारत चांगली झाली आहे; त्याबरोबरीने आता कामाचा दर्जा सुधारा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-02-2014 at 03:20 IST
TOPICSओपनिंग
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening of renewated vidhan bhavan by dilip valse patil