संगीत क्षेत्रामध्ये सध्या सगळे वरवरचे सुरू आहे. त्याचा काही उपयोगही होत नाही. युवकांमधून चांगले कलाकार घडण्यासाठी गुरू-शिष्य परंपरा अखंडित सुरू राहावी, अशी इच्छा ज्येष्ठ पाश्र्वगायक सुरेश वाडकर यांनी रविवारी व्यक्त केली.
ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या ‘संचारी गुरुकुल’चे उद्घाटन सुरेश वाडकर यांच्या हस्ते झाले. आशुतोष पत्की, रूपाली बडिवाई या प्रसंगी उपस्थित होत्या.
सुरेश वाडकर म्हणाले, ज्येष्ठ बंधुतुल्य असलेल्या अशोकजींनी माझ्यासाठी अनेक उत्तम स्वररचनांची निर्मिती केली. गाणे ऐकताना गोड वाटले तरी त्यावर कलाकुसरीचे नक्षीकाम संगीतकार करतात. गाण्याची नजर येण्यासाठी असा गुरू मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्याकडून संगीताचे बारकावे शिकून घेतलेले गायक अन्य कोणत्याही संगीतकारासाठी गाताना कमी पडणार नाहीत हा विश्वास आहे. सुंदर गाणी देऊन अशोक पत्की यांनी रसिकांचे काम तृप्त केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा