पारंपरिक हातमाग यंत्राचे पूजन करून पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाजाच्या अधिवेशनाचे उद्घाटन माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते शनिवारी झाले. समाजाच्या स्मरणिकेचे प्रकाशन आमदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.
लोकसाहित्याचे ज्येष्ठ संशोधक-साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे आणि सोलापूर येथे विडी कामगारांसाठी गृहप्रकल्प साकारणारे माजी आमदार नरसय्या आडम यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. ढेरे यांच्या वतीने त्यांची कन्या आणि प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी हा सत्कार स्वीकारला. सोलापूरचे माजी खासदार धर्माण्णा सादूल, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, ज्येष्ठ काँग्रेस नेते विष्णूपंत कोठे, समाजाचे अध्यक्ष सोमनाथ केंची, वसंतराव येमूल, नगरसेवक गोपाळ चिंतल, महिला आघाडीच्या अध्यक्षा मीनाक्षी काडगी याप्रसंगी उपस्थित होत्या. डॉ. विश्वनाथ येमूल यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा