लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: हडपसर भागात अफू विक्रीसाठी आलेल्या राजस्थानातील तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून ६० लाख रुपयांची अफू जप्त करण्यात आली. माेहनलाल मेगाराम बिष्णोई (वय २४, रा. भगरापूरा, जि. बाडनेर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हडपसर भागातील फुरसुंगी परिसरात एकजण अफू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई योगेश मांढरे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडील पिशवीची तपासणी करण्यात आली. तेव्हा पिशवीत अफू सापडले. बिष्णोईकडून ६० लाख रुपयांची तीन किलो २९ ग्रॅम अफू जप्त करण्यात आली.

हेही वाचा… पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांच्या साथीदारास रत्नागिरीतून अटक; एटीएसकडून आतापर्यंत चारजण अटकेत

दरम्यान, येरवडा भागात स्मशानभूमीजवळ सापळा लावून पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या एकाला पकडले. त्याच्याकडून एक लाख ९८ हजार ७०० रुपयांचा नऊ किलो ९३५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी सोनू साहेबराव कोळसे (वय ४४, रा. सुभाष काॅलनी, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, दिगंबर चव्हाण, संदीप शेळके, योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opium worth rs 60 lakh was seized from a youth from rajasthan pune print news rbk 25 dvr
Show comments