लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : तंत्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य, संचालकपदासाठीच्या थेट नियुक्तीसाठीच्या पात्रता निकषांमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) तज्ज्ञ समितीने प्रस्तावित केलेल्या नव्या अटींनुसार एखाद्या नवउद्यमीचे संस्थापक, सहसंस्थापकांना प्राचार्य, संचालकपदासाठी संधी मिळू शकते.

एआयसीटीईने या संदर्भातील नोटिस संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. प्राचार्य, संचालकपदासाठीच्या पात्रता निकषांमध्ये बदल करण्याबाबत अनेक अध्यापकांकडून मागणी करण्यात आली होती. त्यामुळे हा मुद्दा एआयसीटीईने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीसमोर मांडण्यात आला. त्यानंतर समितीने केलेल्या शिफारशींनुसार एआयसीटीईच्या २०१९ मध्ये प्रसिद्ध राजपत्रातील तरतुदींतील कलम ५.२ (फ) मध्ये बदल प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रस्तावित बदलांवर विविध भागधारकांकडून हरकती सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यासाठी ३० जूनची मुदत देण्यात आली आहे.

आणखी वाचा-कोयता गँगवर ‘मोक्का’, आतापर्यंत पुण्यातील २८ टोळ्यांवर कारवाई

समितीच्या शिफारशींनुसार प्राचार्य, संचालकांसाठी निश्चित केलेले पात्रता निकषांची कक्षा वाढवून अनुभव आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनुभवही समाविष्ट करण्यात आला आहे. प्राचार्य, संचालक पदासाठी एआयसीटीईच्या सध्याच्या नियमांमध्ये प्रामुख्याने तीन निकष आहेत. त्यात पीएचडी पदवी आणि पदवी किंवा पदव्युत्तर पदवीला संबंधित शाखेत प्रथम श्रेणी, किमान दोन पीएचडी उमेदवारांना मार्गदर्शन करणे किंवा किमान आठ शोधनिबंध प्रसिद्ध झालेले असणे, अध्यापन, संशोधन किंवा व्यावसायिक क्षेत्रातील किमान पंधरा वर्षांचा अनुभव, राष्ट्रीय, राज्य, संस्थात्मक स्तरावरील किमान तीन वर्षांचा प्रशासकीय अनुभव यांचा समावेश आहे.

आणखी वाचा-पिंपरी महापालिका करणार बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी आठ कोटी खर्च

तज्ज्ञ समितीने प्रामुख्याने एका मुद्द्यात बदल सुचवला आहे. त्यात किमान दोन पीएचडी उमेदवारांना पर्यवेक्षक किंवा सहपर्यवेक्षक म्हणून मार्गदर्शन, किमान आठ शोधनिबंध विज्ञान संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध असणे या अटींमध्ये बदल केल्याचे दिसून येते. त्यानुसार पीएचडीसाठी मार्गदर्शन किंवा शोधनिबंध प्रसिद्ध झालेले असणे या अटी शिथिल करत काही नव्या अटींचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. किमान दोन एकस्व अधिकार (पेटंट) मंजूर असणे, किमान चार पुस्तकांचे लेखन नामांकित प्रकाशकाकडून प्रकाशित असणे, संयोजक म्हणून चार परिषदांचे आयोजन हे पर्यायी निकष समाविष्ट करण्यात आले आहेत. त्याशिवाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मान्यताप्राप्त नवउद्यमी, इन्क्युबेशन युनिटचे संस्थापक किंवा सहसंस्थापक, राष्ट्रीय स्तरावरील संकेतस्थळासाठी एक मूक अभ्यासक्रम विकसित केलेला असणे, व्यवस्थापन, सार्वजनिक प्रशासन या विषयांमध्ये पदव्युत्तर प्रमाणपत्र, पदविका, पदवी या नव्या अटी समाविष्ट करण्यात आल्याचे दिसून येते.