पुणे : मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी १८ वर्षे वयाची अट असली, तरी आता १७ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांना मतदार यादीत नाव समाविष्ट होण्यासाठी आगाऊ अर्ज करता येणार आहे. १८ वर्षे पूर्ण होताच अर्ज करणाऱ्या संबंधित नवमतदारांची नावे यादीत येणार आहेत. आतापर्यंत १८ वर्षे पूर्ण होण्यासाठी १ जानेवारी हा पात्रता दिनांक असायचा. मात्र, आता भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी नियम १९६० मध्ये सुधारणा केल्या असल्याने १ जानेवारीबरोबरच १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर असे मतदार नोंदणी पात्रता दिनांक उपलब्ध झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १ जानेवारी या दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आणि त्यापुढील १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या दिनांकावर नोंदणीसाठी पात्र (वयाची १८ वर्षे पूर्ण होणारे) अर्जदार आगाऊ मतदार नोंदणी अर्ज सादर करू शकणार आहेत. त्यामुळे मतदारयादीत नाव नोंदविण्यासाठी नवमतदारांना आता अधिकची संधी उपलब्ध झाली आहे.देशपातळीवरील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ बुधवारी (९ नोव्हेंबर) पुण्यात होणार आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. याबाबतची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, की शहरी मतदार आणि युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी पुण्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हेही वाचा : पुणे महापालिकेत लवकरच २०० पदांची भरती; आयुक्तांची माहिती

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी ९ नोव्हेंबरला बालेवाडी येथे सकाळी ६.३० वाजता सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले असून या माध्यमातून पुणे शहराच्या विविध भागांतील नागरिकांमध्ये जनजागृतीसोबतच त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता नवमतदार नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे मतदार जागृतीसाठी प्रदर्शनाचे आयोजित केले आहे. उद्योग क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांचा हिंजवडी येथील टेक महिंद्रा कंपनीच्या सभागृहात विविध उद्योग-संस्थांमध्ये स्थापन झालेल्या मतदार जागृती मंचच्या प्रतिनिधींशी संवाद कार्यक्रम होणार आहे. मतदार नोंदणीबाबत सिम्बायोसिस विद्यापीठात १० नोव्हेंबर रोजी संवाद कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा : पुणे: लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर; त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५२१ मिष्टान्नांचा महानैवेद्य

पुनरीक्षण उपक्रमांतर्गत प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. दावे व हरकती ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत स्वीकारण्यात येतील. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत दोन शनिवार आणि रविवार खास मोहीम राबविण्यात येणार आहे, तर २६ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले