पुणे : मागील काही महिन्यांपासून महिला, लहान मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. या अन्याय अत्याचाराच्या घटनांविरोधात राज्यभरात विविध संघटनांमार्फत आंदोलन करण्यात येत आहे. आज पुण्यातील गुडलक चौकात शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘वध तीनतोंडी रावणाचा, लढा स्त्री सन्मानाचा’ या आशयाचे मजकूर असलेले फलक हाती घेऊन महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. हे फलक मेणबत्तीने पेटवून महिलांवरील अत्याचाराविरोधात निषेध नोंदवण्यात आला.

हेही वाचा – ‘तटस्थ’ मनसे आणि पुणेकरही!

Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा – जेवणात मिरचीचा खर्डा न केल्याने महिलेवर चाकूने वार, येरवडा पोलिसांकडून पतीविरुद्ध गुन्हा दाखल

फलकावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो होते. राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करीत हे फलक मेणबत्तीने पेटवून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की, राज्यातील अनेक भागांत दररोज प्रत्येक क्षणाला महिला, लहान मुलीवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात रोडरोमिओकडून मुलींना त्रास देण्याच्या घटना घडत आहेत. या सर्व घटना लक्षात घेतल्यावर राज्यातील महिला, मुली सुरक्षित नाही आणि दुसर्‍या बाजूला राज्यातील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दौरे, बैठका घेत आहेत. या सरकारला कोणाचेही काही देणेघेणे नाही. हे असंवेदनशील सरकार आहे. त्यामुळे हे सरकार राज्यपालांनी बरखास्त करावे, तसेच अन्याय अत्याचार करणार्‍या नराधमांना तातडीने शिक्षा करावी, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले.