पिंपरी : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बंद असलेल्या ४१ गृहनिर्माण संस्थांचे नळजोड तोडण्याची कारवाई चुकीची आहे. प्रशासनाने कारवाई थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गृहनिर्माण संस्थांमध्ये विकासकांनी अतिशय निकृष्ट दर्जाची यंत्रणा बसविली आहे. सोसायटी हस्तांतरण करत असताना कोणत्याही प्रकारची सोसायटीधारकांची संमती घेतली नाही. सांडपाणी प्रकल्प बंद अवस्थेत असतानादेखील ते सोसायटीधारकांच्या माथी मारले आहेत. महापालिकेने प्रकल्प पाहणी करण्यासाठी नेमलेल्या खासगी ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी याचे सर्वेक्षण व्यवस्थित केलेले नाही. यातील काही प्रकल्प हे चालू असल्याचे पत्र आयुक्तांना दिले होते. संबंधित सर्व गोष्टींची चौकशी करून मग यावर निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. तरीदेखील नळजोड तोडण्याची मोहीम सुरू केलेली आहे. ही मोहीम त्वरित स्थगित करून सर्व गोष्टींची चौकशी करावी, अशी मागणी फेडरेशनने केली आहे.

हेही वाचा – पिंपरी : कट मारल्याने टोळक्याची वकिलाला मारहाण

हेही वाचा – भाताची पेंढी, गवत, उसाची चिपाडे आणि सोयाबिनच्या कचऱ्यापासून बायो सीएनजी… या ठिकाणी होणार प्रकल्प

चिखली-मोशी- पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले, की संबंधित विकसक आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी. तोपर्यंत आम्ही एकाही गृहनिर्माण संस्थेचा नळजोड तोडू देणार नाही. महापालिकेने ही मोहीम स्थगित केली नाही, तर फेडरेशनमार्फत मोठे आंदोलन उभारले जाईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposing the action of disconnecting the taps of housing societies with closed sewage treatment plants pune print news ggy 03 ssb
Show comments