लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर येथील मोटार अपघातप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी थेट पोलीस आयुक्तालयात तळ ठोकून संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन पोलिसांना सूचनाही दिलेल्या असताना, दुसरीकडे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार मात्र घटना घडून चार दिवस उलटून गेले, तरी पुण्यात का आले नाहीत, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत अजित पवार यांनी कोणतीही भूमिका न घेतल्याने, ‘पालकमंत्री कुठे आहेत,’ असा प्रश्न विचारून विरोधकांनी यावरून टीका केली आहे.

Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Challenge of Sharad Pawar group before Tanaji Sawant print
लक्षवेधी लढत: परांडा : तानाजी सावंतांसमोर शरद पवार गटाचे आव्हान
Various questions were asked to Ajit Pawars MLA Anna Bansode through board
पिंपरी विधानसभा: फलकाद्वारे अजित पवारांच्या आमदाराला विचारण्यात आले विविध प्रश्न; गुन्हेगारी, वाहतूक कोंडीचा केला उल्लेख
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
nandgaon assembly constituency
वंचितच्या नांदगाव माजी तालुकाध्यक्षांना माघारीसाठी धमकी

कल्याणीनगर येथील अपघातानंतर वडगावशेरीचे अजित पवार समर्थक आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप समाजमाध्यमातून झाले. त्यामुळे ही बाब अजित पवार यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अडचणीची ठरल्यामुळे ते या सर्व प्रकारापासून दूर राहिले का, असाही प्रश्न विचारला जात आहे.

आणखी वाचा-कल्याणीनगर, मुंढवा परिसरातील मोठ्या हॉटेल्सवर हातोडा, ५४ हजार ३०० चौरस फुटांचे अतिक्रमण जमीनदोस्त

शहरातील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत दोन युवा संगणक अभियंत्यांना जीव गमवावा लागला होता. कल्याणीनगर येथे रविवारी पहाटे झालेल्या या प्रकाराने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधींपासून राज्यातील अनेक नेत्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला होता, तर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात तळ ठोकून या प्रकरणाची माहिती घेतली होती. मात्र, या सर्व प्रकारात पालकमंत्री अजित पवार कुठेच दिसले नाहीत.

अपघाताची घटना घडल्यानंतर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात पहाटे धाव घेतली होती. त्यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाची बाजू घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यानंतर टिंगरे यांनी त्याबाबतचे स्पष्टीकरण समाजमाध्यमातून देतानाच सर्व आरोप फेटाळले होते. मात्र, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी झाल्याने आणि टिंगरे यांचा पुढाकार घातक ठरण्याच्या शक्यतेने अजित पवार या सर्व प्रकारांपासून लांब राहिल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एखादी घटना घडल्यानंतर दौऱ्यावर असतानाही अजित पवार पदाधिकारी, शासकीय यंत्रणांच्या सातत्याने संपर्कात असतात, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. दूरध्वनीवरूनही ते संबंधितांना सूचना करतात, बैठका घेतात. मात्र, या प्रकरणात त्यांनी पदाधिकाऱ्यांबरोबरही संपर्क साधलेला नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

आणखी वाचा-अल्पवयीन मुलाची पाच जूनपर्यंत बालसुधारगृहात रवानगी

शहरातील या दुर्देवी घटनेची पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी तातडीने दखल घेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी ती घेतली नाही, याची खंत आणि खेद वाटत आहे. याबाबत अजित पवार यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. -गोपाळ तिवारी, राज्य प्रवक्ते, काँग्रेस</strong>

देशभरात चर्चा झालेल्या या घटनेमुळे शहराचा नावलौकिक कमी झाला आहे. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी यासंदर्भात तातडीने भूमिका जाहीर करणे आवश्यक होते. ते या प्रकरणापासून दूर का राहिले, हा प्रश्न नागरिकांनाही पडला आहे. -प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष