पिंपरी : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये जनता दरबार सुरू आहे. या दरबारात नागरिक आपल्या व्यथा मांडत असून त्यावर दानवे थेट संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून जाब विचारत आहेत. प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड ठाकरे गटाच्या वतीने जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. आकुर्डीतील खंडोबा मंदिर सभामंडप येथे सुरू असलेल्या जनता दरबाराला पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर, राज्य संघटक एकनाथ पवार, गोविंद घोळवे, मावळ संघटक संजोग वाघेरे, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे उपस्थित आहेत.

हेही वाचा – पुणे : विद्यार्थी संघटनेच्या नियुक्तीवरून काँग्रेस भवनमध्ये राडा; कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा

हेही वाचा – पोलिसांच्या मोटारीची ज्येष्ठ नागरिकाला धडक; पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा

शासकीय योजनांचा लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी, महापालिका प्रशासन दाद देत नाहीत. रेडझोनची मोजणी करावी. रावेत येथील निवासी शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या प्रश्नांकडे नागरिकांनी लक्ष वेधले. वाल्हेकरवाडी परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पाणी समस्या निर्माण होत आहे. एक दिवसाआड पाणी येत असल्याने पाणी साठवण करावी लागते. त्यामुळे शहरात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात आहे. नागरिकांनी तक्रार करताच विरोधी पक्षनेते दानवे संबंधित अधिकाऱ्याला फोन लावत आहेत. संबंधित प्रश्न सोडविण्याचा आदेश देत आहेत. यामध्ये महापालिकेशी संबंधित अधिक प्रश्न आहेत. यासंदर्भात दुपारी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition leader ambadas danve janata darbar at pimpri chinchwad pune print news ggy 03 ssb