पिंपरी: भाजपकडून जिल्हा व शहराध्यक्ष निवड करण्यात आली. यात शंकर जगताप यांची पिंपरी – चिंचवड शहराध्यक्षपदी निवड झाली. हा प्रकार म्हणजे जगताप कुटुंबाला झुकतं माप असून यातून ‘परिवारवाद’ दिसून येतो, असे म्हणत भाजपचे पिंपरी – चिंचवड शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे शहर भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे.

अमोल थोरात यांनी याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्यातील भाजपच्या शहराध्यक्षपदी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. त्यात पिंपरी -चिंचवड शहराध्यक्षपदी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांची निवड जाहीर करण्यात आली. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने पोटनिवडणुकीत संधी दिली. त्यावेळी पक्ष आणि शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या सोबत राहिल्याने अश्विनी जगताप आमदार झाल्या. असे असतानाच जगताप कुटुंबातील शंकर जगताप यांना भाजपने प्रदेश पातळीवर संधी दिली. भाजप संघटनेत अवघे वर्ष झाले नसताना आता शहराध्यक्षपदी त्यांची निवड केली. या निवडीमुळे पक्षाच्या धोरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Deepak Mankar resigned, Deepak Mankar Ajit Pawar group, Deepak Mankar pune,
पुण्यातील अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांचा पदाचा राजीनामा
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Inauguration of the 26th Division Office of the Municipal by the Chief Minister in Andheri East area
निवडणुकीच्या तोंडावर विभाग कार्यालयाच्या विभाजनाचा मुहूर्त; अंधेरी पूर्व परिसरात पालिकेचे आणखी एक विभाग कार्यालय
dispute in maha vikas aghadi over ballarpur constituency seat
काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघावर ठाकरे, शरद पवार गटांचा डोळा
Taluka president Ajit Pawar group,
अजित पवार गटाच्या तालुका अध्यक्षाची मुंबईत हत्या, तिघांना अटक
NcP Ajit Pawar group Byculla Vidhan Sabha Taluka President Sachin Kurmi 45 murdered on Friday midnight
अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची मुंबईतील भायखळ्यात हत्या
The conflict between RR Aba Patil and Sanjay Kaka Patil over the election of Tasgaon Mayor is intense print politics news
तासगाव नगराध्यक्षाच्या निवडीवरून आबा-काका गटातील संघर्ष तीव्र
Prime Minister Narendra Modi Home Minister Amit Shah visit Thane district
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात भाजपची मोर्चेबांधणी सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा ठाणे जिल्हा दौरा

आणखी वाचा-भाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदी धीरज घाटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय पक्षांमधील कुटुंबवादाला नेहमीच विरोध केला आहे. पार्टी विथ डिफरन्स असे म्हणत भाजपने देखील एकाच कुटुंबात अनेक पदे किंवा एकाच कुटुंबातील व्यक्तींना वारंवार संधी देण्याचे टाळले आहे. असे असतानाच जगताप कुटुंबातील व्यक्तींना सतत झुकते माप दिले जाते आहे.

लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी केलेले तंत्र म्हणजे लोकतंत्र (लोकशाही), या तत्वानुसार भाजप संघटना काम करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सांगत असतात. मात्र, त्यांच्या संदेशाकडे दुर्लक्ष करून पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी शंकर जगताप यांची निवड झाली. एकाच कुटुंबाकडे विविध पदे दिली जात आहेत. यातून भाजपच्या धोरण आणि तत्वांना तिलांजली दिली जाते आहे. शहरातील जुन्या व एकनिष्ठ असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना हा निर्णय न पटण्यासारखाआहे. शहरात पक्षाचे अस्तित्व टिकवून पक्षवाढीसाठी सतत झटणाऱ्यांची त्यामुळे घुसमट होत आहे.