पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येरवडा भागातील चार सराइतांना शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिले. वनराज महेंद्र जाधव (वय २१), यशराज आनंद इंगळे (वय २३ ), हिमालय ऊर्फ गोलु मिटु बिश्त (वय २१, तिघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) आणि मयुर विष्णु गुंजाळ (वय २६, रा शनीआळी, येरवडा) अशी तडीपार केलेल्या सराइतांची नावे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘निष्ठा काय असते’ शरद पवार यांचं ट्विट चर्चेत, अजित पवार गटाचे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांना सुनावले

हेही वाचा – पुणे-सातारा रस्त्यावर टोळक्याची दहशत, वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

वनराज जाधव टोळीप्रमुख आहे. जाधव, इंगळे, बिश्त, गुंजाळ यांच्याविरुद्ध खून, दहशत माजविणे, तोडफोड, शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. जाधवसह साथीदारांना पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, स्वाती खेडकर, उपनिरीक्षक महेश फटांगरे, उपनिरीक्षक सुर्वे यांनी तयार केला. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपायुक्त हिम्मत जाधव यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर जाधव याच्यासह चौघांना शहरातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.