गणेशोत्सवात शहर आणि जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने तीन दिवस बंद राहणार आहेत. श्री गणेश चतुर्थी (३१ ऑगस्ट), अनंत चतुर्दशी (९ सप्टेंबर) आणि अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी (१० सप्टेंबर) विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत विसर्जन मार्गालगतच्या भागातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॅा. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील ज्या भागात पाचव्या आणि सातव्या दिवशी विसर्जन सोहळा पार पडणार आहे. तेथील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी पुणे जिल्हा आणि शहरातील मद्यविक्रीची दुकाने संपूर्ण दिवस बंद राहणार आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहर आणि जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकाने संपूर्ण दिवस बंद राहणार आहे.
विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत दुसऱ्या दिवशी (१० सप्टेंबर) मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार आहेत.ज्या भागात पाचव्या आणि सातव्या दिवशी विसर्जन सोहळा पार पडतो. तेथील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणूक मार्गावरील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.