कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (२६ फेब्रुवारी) मतदान होणार आहे. निवडणुकीत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार,अधिकारी, कर्मचारी यांना मतदान करता यावे, यासाठी २६ फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत देण्याबाबत परिपत्रक शासनाने प्रसृत केले आहे.

हेही वाचा- पदवी प्रवेशासाठी सीयूईटी, सीयूईटीचे गुण स्वीकारा; यूजीसीचे उच्च शिक्षण संस्थांना आवाहन

what 12 lakh exemption means and how tax is calculated
१२ लाख करमुक्त उत्पन्नाची सवलत नेमकी कुणासाठी?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
high court ordered election notification in one month and imposed restrictions on Chandrapur District Banks board
हायकोर्टाच्या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ नामधारी; एक महिन्यात…
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
one nation one time
One Nation, One Time नक्की आहे तरी काय? सरकारने याचा मसुदा का तयार केला? याचा फायदा काय?
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
chief minister devendra fadnavis appointment of ministers staff swearing ceremony
मंत्र्यांच्या शपथविधीला दीड महिना होऊनही कर्मचारी नियुक्ती प्रलंबित असल्याने अडचणी
The Election Commission's rate card for Delhi Assembly elections sets spending limits on various items, from pens to elephants.
छोले भटूरे ३५ रुपये तर रॅलीतील हत्तीसाठी ६१५० रुपये, दिल्ली विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना किती खर्च करता येणार?

लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५१ मधील कलम १३५ (ब) नुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये कर्मचाऱ्यांना संस्था / आस्थापना भरपगारी सुटी किंवा सवलत देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर हे परिपत्रक प्रसृत करण्यात आले आहे.

हेही वाचा- ‘भलेही धनुष्य हिरावून घ्याल, पण मनुष्य आजही मातोश्रीसोबत’; पुण्यात शिंदे गटाविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे आंदोलन

दरम्यान, निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले,तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल,तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र, त्याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक राहील. याबाबत तक्रार आल्यास संबंधितांविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येईल, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader