पुणे : एका रुग्णाच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला मेंदूमृत घोषित केले. या रुग्णाचे अवयवदान केल्यास इतर रुग्णांचे जीव वाचू शकतील, असे आवाहन त्याच्या नातेवाइकांना डॉक्टरांनी केले. अखेर कुटुंबीयांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे या व्यक्तीची दोन्ही मूत्रपिंडे, यकृत आणि नेत्रपटलाचे दान करण्यात आले. दोन्ही मूत्रपिंडे आणि यकृताचे प्रत्यारोपण तीन जणांना करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारती हॉस्पिटलमध्ये ५७ वर्षीय रुग्ण मेंदूत रक्तस्राव झाल्याने मेंदूमृत अवस्थेत होता. त्याच्या अवयवदानाने अनेकांचे प्राण वाचू शकतात हे अतिदक्षता विभागातील डॉक्टरांच्या लक्षात आले. भारती हॉस्पिटलमधील वैद्यकीय सामाजिक विभाग, केरळी चॅरिटेबल फाउंडेशन, पुणे आणि आंतरराष्ट्रीय मानवता आयोगाच्या पथकाने रुग्णाच्या नातेवाइकांचे समुपदेशन केले. त्यानंतर विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या समन्वयक आरती गोखले यांना कळविण्यात आले. त्यांनी तातडीने इतर रुग्णालयांशी समन्वय साधून अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण केली.

आणखी वाचा-पुणे : पर्वती दर्शन भागात टोळक्याची दहशत; वाहनांची तोडफोड

या रुग्णाचे एक मूत्रपिंड भारती हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड नाशिकमधील अपोलो हॉस्पिटल येथील रुग्णाला देण्यात आले. रुग्णाचे यकृत बाणेरमधील ज्युपिटर हॉस्पिटल येथील रुग्णाला देण्यात आले. रुग्णाच्या डोळ्यातील नेत्रपटल भारती हॉस्पिटल नेत्रपेढीत ठेवण्यात आले आहे. या नेत्रपटलामुळे एखादा अंध जग पाहू शकणार आहे. आरोग्य विज्ञान विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप, वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवानी, उपसंचालक डॉ. जितेंद्र ओसवाल यांनी यात मार्गदर्शन केले.