अवयवदात्यांची संख्या आणि अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या यांचे प्रमाण व्यस्तच असल्याची बाब ‘जागतिक अवयवदान दिना’च्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे. गेल्या ७ महिन्यांत पुणे विभागात १३ अवयव प्रत्यारोपणे झाली आहेत. यात ९ मूत्रपिंड प्रत्यारोपणे आणि ४ यकृत प्रत्यारोपणांचा समावेश आहे. परंतु अवयव प्रत्यारोपणासाठी ‘वेटिंग लिस्ट’वर असलेल्या रुग्णांची संख्या मात्र १४७ आहे.
पुण्यासह क ऱ्हाड, मिरज, नाशिक, सोलापूर, धुळ्यातील रुग्णालयांचा पुणे विभागात समावेश होतो. सध्या विभागात ११७ रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या तर ३० रुग्ण यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी’च्या समन्वयक आरती गोखले यांनी दिली. ही आकडेवारी पाहता अवयवदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचण्याची निकड या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
‘झेडटीसीसी’चे सचिव डॉ. अभय हुपरीकर म्हणाले, ‘‘आपल्या घरात मूत्रपिंडाचा किंवा यकृताचा विकार असलेला रुग्ण असेल, तरच अवयवदान आणि अवयवप्रत्यारोपणाची नातेवाइकांना माहिती असते. त्यामुळे अवयवदानाविषयी जनजागृती होणे खूप गरजेचे आहे. नेत्रदानाविषयी नागरिकांना आता चांगली माहिती असल्याचे दिसून येते. इतर अवयवांचे दानही नेत्रदानाइतकेच सहज झाले पाहिजे.’’
पुण्यातील १५ मोठय़ा रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपणे केली जातात. तसेच जिथे प्रत्यक्ष अवयव प्रत्यारोपण होत नाही परंतु अवयव दानासाठी अवयव काढून घेण्याची त्यांना परवानगी आहे अशी तीन ‘नॉन ट्रान्सप्लान्ट ऑर्गन रीट्रायव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) देखील पुणे विभागात असल्याचे गोखले यांनी सांगितले. ‘औंधचे जिल्हा रुग्णालय, पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आणि नाशिकचे जिल्हा रुग्णालय एनटीओआरसी म्हणून नोंदणीकृत आहे,’ असे त्या म्हणाल्या.
अवयवदानाची ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी’ने पुरवलेली आकडेवारी –
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा