राज्य शासनातर्फे १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी ‘ग्रंथोत्सव- २०२२’ आयोजित करण्यात आला आहे. घोले रस्ता येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात होणाऱ्या या ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीसह सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

हेही वाचा- लोक अदालतीत पुणे राज्यात प्रथम; सर्वाधिक ६६ हजार प्रलंबित दावे निकाली

सांस्कृतिक धोरण-२०१० अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय मुंबई, पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पुणे यांच्यातर्फे ग्रंथोत्सव होत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी (१५ नोव्हेंबर) सकाळी साडेअकरा वाजता उद्घाटन होणार आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे या वेळी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात येईल. उद्घाटनानंतर ‘सार्वजनिक ग्रंथालयांची उर्जितावस्था’ या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे मार्गदर्शन, जी.ए. कुलकर्णी यांच्या कथांचे अभिवाचन, ‘कुटुंब रंगले काव्यात’ या एकपात्री नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होईल. तसेच ग्रंथप्रदर्शनात विविध नामांकित प्रकाशनांची पुस्तके मांडली जातील. सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन विनामूल्य खुले राहील, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रे. श्री. गोखले यांनी केले.

Story img Loader