पुणे : वनपरिक्षेत्र पुणे अंतर्गत हवेली तालुक्यातील मौजे वडगाव शिंदे येथे मृत झालेल्या बिबट्याच्या अवयवांची चोरी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

नवनाथ खांदवे यांच्या शेतात ८ फेब्रुवारी रोजी बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्या बाबत माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत मादी बिबट वय अंदाजे १० महिने ताब्यात घेतले. ९ फेब्रुवारी रोजी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याचे पायाची ३ नखे व पंजा धारधार शस्त्राने कापून काढल्याचे दिसून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन श्वान पथकच्या साहाय्याने तपास केला.

Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा
dead body buried
अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral
Father Two children dies after truck hits bike
पुणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; चालकाने मद्यप्राशन केल्याचा संशय
shahapur two Arrested Uttar Pradesh bullion shop worker murder
सराफाच्या दुकानातील कामागाराची हत्या करणाऱ्यास उत्तरप्रदेशातून अटक, दोन आरोपींचा शोध सुरू
goon sharad mohol murder revenge
गुंड शरद मोहोळच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न फसला, मोहोळच्या साथीदारांकडून पिस्तुले, काडतुसे जप्त

हेही वाचा…‘नीट-यूजी’ची अर्ज प्रक्रिया सुरू, यंदा परीक्षा होणाऱ्या शहरांच्या संख्येत वाढ

ऊसतोडणी मजूर यांच्याकडे चौकशी केली असता एका अल्पवयीन मुलाने वडिलांच्या व सोबतच्या २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृत बिबट्याचे ३ नखे, पायाचा पंजा, त्याचे १ नख अशी एकूण ४ नखे कोयता, सुरीच्या साहाय्याने कापून लपवून ठेवल्याचे सांगितले. तसेच बिबटच्या नखाचे गळ्यातील लॉकेट बनवण्याचे उद्देशाने आकर्षणापोटी गुन्हा केल्याचे सांगितले.

हेही वाचा…छगन भुजबळ म्हणाले, ‘अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी…’

आरोपीकडून ४ बिबट नखे, १ पायाचा पंजा, गुन्ह्यात वापरलेले २ सुरे जप्त करण्यात आले आहेत. आरोपी कांतीलाल चांदरसिंग सोनवणे आणि दोन अल्पवयीनांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सहा.वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी केली.

Story img Loader