राज्यातील जनतेने मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार पाहिलं आहे. त्या संपूर्ण कालावधीत भ्रष्टाचार घडला. त्यामुळे त्यांचे दोन मंत्री गजाआड झाले आहेत, तर अनेक मंत्री त्याच मार्गावर आहेत. या भ्रष्टाचारी कारभाराला जनता वैतागली आहे. यामुळे येणार्‍या पुणे महापालिका निवडणुकीत १०० प्लस नगरसेवक निवडून आणण्याचा आमचा निर्धार आहे आणि हीच देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची भेट असणार आहे. असे मत भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज(२२ जुलै) वाढदिवस असल्याने, पुणे शहरात भाजपाकडून विविध भागात आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. त्याच दरम्यान भाजपा शहर कार्यालयात युवा मोर्चाकडून काही निवडक छायाचित्राच प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी केक देखील कापण्यात आला असून या छायाचित्रांच्या प्रदर्शनाच उद्धाटन भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले.

तर यावेळी कार्यक्रमाचे आयोजक युवा मोर्चा पुणे शहराध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, सरचिटणीस प्रतीक देसर्डा, दिपक पवार आणि आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या छायाचित्रांच्या माध्यमांतून महाविकास आघाडी सरकार, तसेच माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष केल्याचे पाहण्यास मिळत आहे.

फडणवीस हे पुण्याच्या विकासाला चालना देतील –

यावेळी जगदीश मुळीक म्हणाले की, “भाजपाची सत्ता केंद्रात आणि राज्यात असताना. मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आली. मात्र अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार राज्यात असताना त्या नेत्यांनी केवळ स्वत: चा विकास करण्यावर भर दिला.”

तसेच “आता पुन्हा आमची राज्यात सत्ता आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या विकासाला चालना देतील आणि जे काही प्रलंबित प्रकल्प होते, ते मार्गी लागतील.” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.