पुणे प्रतिनिधी :मागील आठवड्यात राज्यातील महायुती सरकारचे खाते वाटप झाले.त्यानंतर कोणत्या पक्षाच्या मंत्र्यांना पालकमंत्रीपदी निवड केले जाते.याकडे सर्वांचे लागून राहिले आहे.त्यावरून महायुतीमध्ये केवळ चर्चा सुरू आहे. त्याच दरम्यान कोथरूड चे भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील हे पुणे दौर्‍यावर आले होते.त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधत राज्यातील घडामोडी बाबत भाष्य देखील केले.

महायुतीमध्ये पालकमंत्री पदाचा काही फॉर्म्युला ठरला आहे का ? त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की,राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री पदाबाबत निर्णय करतात.त्यांना दोन चांगले सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळालेले आहेत.ते तिघेजण मिळून काही ना काही विचार करून घेतील,त्यामुळे प्रत्येकाने कामाला लागल पाहिजे.तसेच समन्वय नावाचा आणि समजूतदारपणाचा आमचा फॉर्म्युला असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

Story img Loader